आज

रोमेनियाचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष क्लाउस इओहन्निस यांनी मिहाइ टूडोस यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. 50 वर्षीय टूडोस हे PSD पक्षाचे राजकारणी आहेत. शिवाय ते रोमानियाच्या संसदेचे उप-सभापति, अर्थमंत्री देखील राहलेले आहेत. रोमानिया हा दक्षिण-पूर्व युरोपियन देश आहे. 

रेस अक्रॉस अमेरिका (RAAM) स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रथम भारतीय सोलो व्यक्तिचे नाव ओळखा. 

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

रेस अक्रॉस अमेरिका (RAAM) स्पर्धा पूर्ण करणारे भारतातले प्रथम सोलो व्यक्ति म्हणून नाशिकचे आर्मी डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ आणि नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ यांची नोंद झाली आहे. सोलो 18-95 वयोगटात 36 वर्षीय गोकुळनाथ (7 वे) यांनी 11 दिवस आणि 18 तासांत 3070 मैल (494 किमी) अंतर पूर्ण केले तर यासाठी समर्थांना (8 वे) 11 दिवस आणि 21 तास लागले. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी 9 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

वैज्ञानिक डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे इतर 8 सदस्य आहेत. गेल्या तीस महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत अभ्यास केला जात आहे. हजारो सूचना, शिफारसी, चर्चासत्र आयोजित करून व्यापक अभ्यासासाठी माहिती गोळा केली गेली आहे. MyGov व्यासपीठाचा यासाठी वापर करण्यात आला. 

कोणत्या देशाने वा राष्ट्रसंघाने जून 2017 मध्ये हिजबुल मुजाहिदीन या काश्मीरी अतिरेकी गटाचा प्रमुख सय्यद सल्लुद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित केले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

अमेरिकेच्या सरकारने हिजबुल मुजाहिदीन या काश्मीरी अतिरेकी गटाचा प्रमुख सय्यद सल्लुद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित केले. सलाहूद्दीन आणि सर्व सलाहूद्दीनच्या संपदे बाबत असलेल्या कोणत्याही हितसंबंध व्यवहारांमध्ये गुंतण्यास अमेरिकन नागरिकांना प्रतिबंध घातला आहे.

इंडिया इंटरनॅशनल सेंटर (IIC) च्या प्रेसिडेंट पदासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांची इंडिया इंटरनॅशनल सेंटर (IIC) चे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रख्यात न्यायिक सोली सोराबजी यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे. IIC ही  भारतामधली एक प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे.

54 व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 चा खिताब कोणी जिंकला?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

54 व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 चा खिताब हरियाणाच्या मानुषी छिल्लर हिने जिंकला आहे. स्पर्धा मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. जम्मू-कश्मीरची सना दुआ हिने स्पर्धेचे फर्स्ट रनर-अप आणि बिहारची प्रियंका कुमारी हिने सेकंड रनर-अप खिताब जिंकला. याशिवाय, वनिला भटनागर हिला मिस अॅक्टिव मुकुट तर वामिका निधी हिने 'बॉडी ब्युटीफुल' हा विशेष पुरस्कार जिंकला.

श्री अमरनाथजी श्राइन मंडळाने यात्रेकरू व सेवा पुरवठादारांसाठी असलेल्या समूहाच्या विम्याची संरक्षण रक्कम _________ पर्यंत वाढवली आहे.

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

श्री अमरनाथजी श्राइन मंडळाने यात्रेकरू व सेवा पुरवठादारांसाठी असलेल्या समूहाच्या विम्याची संरक्षण रक्कम सध्याच्या 1 लाखावरून आता 3 लाखांपर्यंत वाढवली आहे. दक्षिण काश्मीरच्या हिमालयमध्ये अमरनाथच्या 3,880 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेला भेट देण्यासाठी आयोजित वार्षिक यात्रेस हे मंडळ संचालित करते.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या ___________ रॅपिड फायर पिस्तूल पुरुष प्रकारात भारताला सांघिक कांस्यपदक मिळाले.

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

सुहल (जर्मनी) मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पुरुष प्रकारात भारताला सांघिक कांस्यपदक मिळाले. सांघिक प्रकारात अनिश शोने, अनहद जवांन्दा आणि शिवम शुक्ला या गटाने हे पदक मिळवले.

लोढा मंडळाने सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता BCCI ने 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

लोढा मंडळाने सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ने 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष IPL मुख्य राजीव शुक्ला हे आहेत.

भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात संधी ओळखण्यासाठी भारत-अमेरिका व्यापार परिषद (USIBC) ने तयार केलेल्या कार्यदलाचे नेतृत्व कोणाकडे आहे?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारत-अमेरिका व्यापार परिषद (USIBC) ने भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात संधी ओळखण्यासाठी एक कार्यदल तयार केले. दलाचे नेतृत्व प्रेट अँड व्हिटनी चे व्यवस्थापकीय संचालक (भारत) पलाश रॉय चौधरी आणि KPMG चे प्रमुख (अंतराळ व संरक्षण) अंबर दुबे यांच्याकडे दिले आहे. ही समिती भारताच्या राष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक धोरण (NCAP) वर आधारीत कार्यान्वयनासाठी संधी शोधण्यास मदत करणार.

उद्या

सिडनी येथे खेळलेल्या 2017 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सिडनी येथे खेळलेल्या 2017 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत चीनच्या चेन लॉंगचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी खुली स्पर्धा आहे. 2011 साली स्पर्धेला ग्रँड प्रिक्स गोल्ड दर्जा प्राप्त झाला. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डला 2014 साली सुपर सीरिज दर्जा देण्यात आला.

_______________ सरकारने नियमित राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय वाढवून 60 वर्षे एवढे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

अरुणाचल प्रदेश सरकारने नियमित राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय वाढवून 60 वर्षे एवढे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल. वर्तमान नियमांनुसार राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वय 58 वर्षे आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, सर्व राज्यांची एकूण वित्तीय तूट वित्तीय वर्ष 2016-17 मध्ये किती आहे?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, सर्व राज्यांची एकूण वित्तीय तूट वित्तीय वर्ष 2016-17 मध्ये 4,93,360 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे, जेव्हा की ही तूट 1991 साली 18,790 कोटी रुपये होती. वर्ष 2017-18 मध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार ही तफावत 4,49,520 कोटी रुपये इतके असण्याचे अंदाजित आहे. उत्तर प्रदेश (64,320 कोटी रुपये), राजस्थान (67,350 कोटी रुपये) आणि महाराष्ट्र (37,950 कोटी रुपये) यांच्यात सर्वाधिक वित्तीय तूट आढळून येत आहे.

कोणत्या भारतीय खेळाडूने सुहल (जर्मनी) मध्ये ISSF कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

पिस्तुल नेमबाज यशस्विनी सिंग देसवाल हिने सुहल (जर्मनी) मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने 235.9 गुण मिळवून विश्वविक्रम केला आहे. या गटात स्पर्धेचे रौप्यपदक कोरियाची वूरी किम हिने तर कांस्यपदक इटलीची ज्युलिया कॅम्पोस्ट्रिनी हिने मिळविले.

भारतीय रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार लेह येथे समुद्रसपाटीपासून ________ उंचीवर असलेले रेलरूळ हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला रेलरूळ ठरले आहे. 

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारतीय रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार लेह येथे समुद्रसपाटीपासून 3,300 मीटर उंचीवर असलेले रेलरूळ हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला रेलरूळ ठरले आहे. या विक्रमाने चीनच्या क्विंघाय-तिबेट रेल्वेचा विक्रम मोडला गेला. भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीर मधील लेह येथे असलेले 498 किलोमीटर लांबीचे बिलासपूर-मनाली-लेह या रेलमार्गाचे सर्वेक्षण केले. हा मार्ग संरक्षण मंत्रालयाचे अंदाजे 157.77 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. 

कोणत्या भारतीय मुष्टियुद्धपटूने 2017 उलानबातर चषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या पुरुष 60 किलो गटात सुवर्णपदक जिंकले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारतीय खेळाडू अंकुश दहिया याने मंगोलियात आयोजित 2017 उलानबातर चषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या पुरुष 60 किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. अंकुशचे हे पहिले वरिष्ठ पातळीवरचे आंतरराष्ट्रीय पदक आहे. 52 किलो गटात एल. देवेंद्रो सिंग याने रौप्यपदक मिळवले. के श्याम कुमार (49 किलो), मोहम्मद हुसमुद्दीन (56 किलो) आणि प्रियंका चौधरी (60 किलो) यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.

“अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

12 डिसेंबर 1997 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव 52/149 मंजूर करून दरवर्षी 26 जून ही तारीख “अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” याची स्थापना केली. या दिवशी जागतिक स्तरावर अत्याचारासंबंधी मुद्द्यांवर एकूणच निर्मूलन करण्याच्या उद्देशाने कार्यांना प्रोत्साहन दिले जाते.

कोणत्या मंत्रायाकडून भारतातील संस्थांचे जागतिक स्तरावर गुणवत्तेत स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोणातून व्हिजिटिंग एडवांस्ड जॉइंट रिसर्च (VAJRA) या ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या फॅकल्टी योजनेसाठी व्हिजिटिंग एडवांस्ड जॉइंट रिसर्च (VAJRA) या ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण केले आहे. भारतातील संस्थांचे जागतिक स्तरावर गुणवत्तेत स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोणातून सर्वोत्तम जागतिक बुद्धिमत्तेला एकत्र आणण्याचे काम हे व्यासपीठ करेल. या योजनेअंतर्गत वर्षातील तीन महिन्यांसाठी परदेशी प्राध्यापक सदस्यांना निवडण्यात येईल. त्यांना पहिल्या महिन्यामध्ये USD 15,000 तर दुसऱ्या व तिसर्‍या महिन्यासाठी USD 10,000 मानधन दिले जाईल.

कोणत्या टेनिसपटूने बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या 2017 एगॉन क्लासिक स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

झेक प्रजासत्ताकची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हा हिने बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या 2017 एगॉन क्लासिक स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. तिने अंतिम खेळात ऑस्ट्रेलियाच्या एशले बार्टीचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या एशले बार्टी व केसी डेलॅक्वा या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.

टेनिसपटू रॉजर फेडरर याने हॅले, जर्मनी येथे खेळलेल्या 2017 हॅले ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. फेडरर कोणत्या देशाचा निवासी आहे?

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

स्वीत्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने हॅले, जर्मनी येथे खेळलेल्या 2017 हॅले ओपन स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेव्हचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. फेडररचे हे विक्रमी नववे हॅले ओपन विजेतेपद आहे. पोलंडचा लुकाझ कुबोत व ब्राझीलचा मार्सेलो मेलो या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले.

ASSOCHAM च्या 'वेस्ट मॅनेजमेंट इन इंडिया: शिफ्टिंग गियर' अहवालानुसार भारताला कचऱ्याच्या विल्हेवाटीखाली 2050 सालापर्यंत ________ जमीन वापरात आणावी लागेल, जे की नवी दिल्ली नगरपरिषदेच्या प्रशासनाखाली असलेल्या भूखंडाच्या बरोबरीत आहे.

बुकमार्क

 • a
 • b
 • c
 • d

आपले उत्तर चुकीचे आहे

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ ऑफ इंडिया (ASSOCHAM) च्या 'वेस्ट मॅनेजमेंट इन इंडिया: शिफ्टिंग गियर' अहवालानुसार भारताला कचऱ्याच्या विल्हेवाटीखाली 2050 सालापर्यंत 88 चौ.कि.मी. जमीन वापरात आणावी लागेल, जे की नवी दिल्ली नगरपरिषदेच्या प्रशासनाखाली असलेल्या भूखंडाच्या बरोबरीत आहे.

मराठी मी चालू घडामोडी टिप्पणी