Bookmark Bookmark

किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन

किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्ली आयोज

हिर्‍यांच्या उद्योगांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेली जागतिक संघटना ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याची वर्षातली शेवटची बैठक 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2019 या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीदरम्यान शाश्वत उपजीविका निर्मितीद्वारे आर्थिक समावेशकता आणि महिला सक्षमीकरण, डायमंड इंडस्ट्री – अडाप्टींग टू चेंज, डायमंड ऑरिजिन अँड इडेंटिफिकेशन यांच्या संदर्भात तीन विशेष मंचांच्या बैठकी घेण्यात आल्या.

ठळक बाबी

  • ‘किंबर्ली प्रोसेस (KP)’ हा हिर्‍यांच्या व्यापारामधला एक महत्त्वाचा शिष्टाचार (प्रोटोकॉल) आहे, ज्याने जगातले 99.8 टक्के हिरे संघर्षमुक्त असल्याचे सुनिश्चित केले आहे.
  • सध्या, भारत सुमारे 24 अब्ज डॉलरच्या ‘कट आणि पॉलिश’ हिर्‍यांची निर्यात करतो. अशी अपेक्षा आहे की येत्या काही वर्षांमध्ये भारताचा हा व्यापार 1 महादम (ट्रिलियन) डॉलरपर्यंत पोहचणार. भारतात दहा लक्षाहून अधिक लोक हिर्‍यांच्या उद्योगात गुंतलेले आहेत.
  • भारत ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि सन 2019 साठी ‘किंबर्ली प्रोसेस’ याचा अध्यक्ष आहे. भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव बी. बी. स्वाइन हे “KP चेअर” तर वाणिज्य विभागाचे आर्थिक सल्लागार रूपा दत्ता या “KP फोकल पॉईंट” आहेत.
  • 22 नोव्हेंबर 2019 रोजी बैठकीच्या शेवटी भारत KPचे अध्यक्षपद रशियाकडे सोपविणार आहे.

किंबर्ली प्रोसेस (KP) विषयी

सन 1998 मध्ये आफ्रिकेतल्या बंडखोरांनी सरकारांविरूद्धच्या विद्रोही चळवळींसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बेकायदेशीरपणे प्राप्त झालेल्या हिर्‍यांचा व्यापार केला जात होता. त्यास आळा घालण्यासाठी ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ व्यवस्था 1 जानेवारी 2003 पासून अंमलात आणली गेली.

भारत KPCSचा संस्थापक सदस्य आहे आणि त्याच्या क्रियाकलापांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. किंबर्ली प्रोसेस (KP) याचे 82 देशांचे 55 भागीदार आहेत, त्यात युरोपीय संघ आणि त्याच्या सदस्य राज्यांचाही सहभाग आहे.

क्षमता बांधणी, तांत्रिक सहाय्य आणि मूल्यमापनासंबंधी शिक्षण, नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे यामधील फरक ओळखणे, कायदेशीर आणि औपचारिक खनिकर्म सराव पद्धतींचे महत्त्व याबाबतीत आर्टिसनल आणि स्मॉल-स्केल मायनिंग (ASM) यांना मदत पुरविणे, हे KPCS याचे उद्दिष्ट आहे. हा शिष्टाचार जुलै 2000 मध्ये स्थापना झालेल्या जागतिक हिरे परिषद (World Diamond Council) याच्या व्यवस्थापनाखाली चालतो.

हिरे उत्पादन, व्यापार आणि निर्मिती यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनमानांबद्दल कार्यक्षम, अधिक पारदर्शी वितरणाच्या दृष्टीने ते वचनबद्ध असलेल्या बाबतीत समावेशकता, मजबूत प्रशासन आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने KPCS याच्या माध्यमातून मजबूत प्रक्रिया तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातात.  

You might be interested:

एका ओळीत सारांश, 19 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर. संरक्षण 17 नोव्हेंबर रोजी द ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:18 November 2019

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झालीदिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

9 महिना पूर्वी

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश दिनांक 17 नोव्हेंब ...

9 महिना पूर्वी

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 18 नोव्हेंबर 2019

दिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:17 November 2019

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: