Bookmark Bookmark

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचा 19 वा स्थापना दिन साजरा केला.

राज्याविषयी

झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागात असलेले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा करून या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन 2000 मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय प्रजासत्ताकमधले 28 वे राज्य म्हणून दिनांक 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड अस्तित्वात आले. रांची हे शहर झारखंड राज्याची राजधानी आहे.

  • राज्यात 24 जिल्हे आहेत आणि 14 लोकसभा मतदारसंघ आहेत. संथाली, हिंदी, उर्दू या राज्यभाषा आहेत.
  • झारखंडच्या पूर्वेला पश्चिम बंगाल आणि पश्चिमेला उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड, उत्तरेला बिहार आणि दक्षिणेला ओरिसा राज्य आहे.
  • झारखंड हे तांबे, कोळसा, लोखंड, मॅगनिज, अभ्रक, क्रोमाइट, बॉक्साइट इत्यादी खनिजांमुळे देशातले सर्वाधिक समृद्ध राज्य म्हणून गणले जाते. तांदूळ, गहू व मका ही येथली प्रमुख पिके आहेत.
  • राज्यातली मुंडाची कला म्हणून काही चित्रकला प्रसिद्ध आहेत. तसेच तुरी चित्रकलामध्ये नैसर्गिक मातीच्या रंगात घरातल्या भिंतीवर रंगकाम केले जाते. लोकनृत्य कलाप्रकारांमध्ये कर्मा, मुंडा, झुमार असे काही लोकनृत्य केले जातात.

You might be interested:

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 16 नोव्हेंबर 2019

दिनविशेष कैदेत असलेल्या लेखकाचा दिन - 15 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भविष्यात व ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:15 November 2019

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्नब्राझील या देश ...

9 महिना पूर्वी

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा 14 नोव्हेंबर 2017 र ...

9 महिना पूर्वी

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न ब्राझील या ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 15 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला बालदिन - 14 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भारतामधून होणार्‍या ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: