Published on: November 18, 2019 4:00 PM
Bookmark
दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन ह्यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मी ह्यांनी राजभवनात एका सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली.
न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन झारखंड उच्च न्यायालयाचे 13 वे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत. माजी मुख्य न्यायाधीश अनिरुद्ध बोस ह्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यावर हे पद मे 2019 या महिन्यापासून रिक्त होते.
भारतीय उच्च न्यायालय
भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.
सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायधीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्यायधीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.
महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.
राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...
3 आठवडा पूर्वीदिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...
3 आठवडा पूर्वीराष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...
3 आठवडा पूर्वीसर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...
3 आठवडा पूर्वीराष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...
3 आठवडा पूर्वीदिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...
4 आठवडा पूर्वी