Bookmark Bookmark

दैनिक बातम्या डायजेस्ट:27 April 2020

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल

जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल रोजी पाळला जातो. 2020 साली हा दिन “इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर” या संकल्पनेखाली पाळला गेला. नवकल्पना आणि रचनात्मकता यांस प्रोत्साहन देण्यामध्ये बौद्धिक संपदा (IP) अधिकारांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

बौद्धिक संपदा म्हणजे कल्पनेतून साकारलेल्या रचना, शोध, साहित्यिक आणि कलात्मक कार्ये आणि व्यवसायिक क्रियाकलापांमध्ये वापरली जाणारी चिन्हे, नावे आणि प्रतिमा होय.

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले यांत्रिक व्हेंटीलेटर

जम्मू व काश्मीरच्या पुलवामा येथील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (IUST) या संस्थेच्या पुढाकाराने भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) श्रीनगर या संस्थांच्या अभियंत्यांच्या चमूनी मिळून नव्या प्रकारचे यांत्रिक व्हेंटीलेटर विकसित केले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या व्हेंटीलेटरला ‘रूहदार’ असे नाव दिले आहे.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत त्यांनी कमी खर्चात व्हेंटीलेटर विकसित केले आहे. या व्हेंटीलेटरसाठी सुमारे 10,000 रुपये खर्च येतो. सध्या उत्तम प्रतीच्या व्हेंटीलेटरसाठी लाखो रुपये खर्च येतो.

You might be interested:

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले यांत्रिक व्हेंटीलेटर

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले ...

5 महिना पूर्वी

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 27 एप्रिल 2020

दिनविशेष जागतिक लसीकरण आठवडा - 24 एप्रिल ते 30 एप्रिल. आंतरराष्ट्रीय चेरनोबिल ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:26 April 2020

"जागतिक लसीकरण आठवडा”: 24 एप्रिल ते 30 एप्रिल“व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल” या संकल ...

5 महिना पूर्वी

जागतिक मलेरिया दिन: 25 एप्रिल

जागतिक मलेरिया दिन: 25 एप्रिल मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्या नि ...

5 महिना पूर्वी

"जागतिक लसीकरण आठवडा”: 24 एप्रिल ते 30 एप्रिल

"जागतिक लसीकरण आठवडा”: 24 एप्रिल ते 30 एप्रिल “व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल” या सं ...

5 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: