Bookmark Bookmark

दैनिक बातम्या डायजेस्ट:28 April 2020

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले

पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या ओझोन थरात एक मोठे छिद्र पडले होते. हे छिद्र नैसर्गिकरीत्या संपूर्णपणे भरून निघाले आहे. ही बातमी कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने दिली.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छिद्र बंद होण्यामागचे कारण स्थितांबर गरम होणे हे आहे. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचे तापमान वाढू लागते. यामुळे, आर्क्टिकच्या वरील स्थितांबराचा थर देखील गरम होऊ लागला आणि ओझोन थरात ओझोन वाढू लागतो. त्यामुळेच ते छिद्र बंद झाले.

ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम

जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) जागतिक भागीदारांच्या गटासहीत कोविड-19 साठी नवीन अत्यावश्यक तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी आणि विकासासाठी “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” (किंवा ACT एक्सेलिरेटर) कार्यक्रमाची सुरुवात केली. या भागीदारीत BMGF, CEPI, GAVI, ग्लोबल फंड, UNITAID, वेलकम ट्रस्ट या संस्थांचा समावेश आहे.

कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना उपचार मिळवून देण्याकरिता पुरावे असलेल्या उपाययोजनांचा अवलंब करणे, अभिनव उपचार पद्धती व लस तयार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

You might be interested:

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम जागतिक आरोग्य संघ ...

5 महिना पूर्वी

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले पृथ्वीच्या उत्तर ध्रु ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 28 एप्रिल 2020

दिनविशेष 2020 साली जागतिक पशुवैद्य दिन (एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार) याची ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:27 April 2020

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिलजागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले यांत्रिक व्हेंटीलेटर

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले ...

5 महिना पूर्वी

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: