Bookmark Bookmark

दैनिक बातम्या डायजेस्ट:29 April 2020

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) होणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागी करण्याच्या उद्देशाने गुजरातच्या गांधीनगर या शहरात ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ (International Financial Services Centres Authority) याची स्थापना करण्यात आली आहे.

27 एप्रिल 2020 हा दिवस प्राधिकरणाचे स्थापना दिन असणार आणि त्याचे मुख्यालय गांधीनगर येथे असणार अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली.

आता, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) हे भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) चालणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांमध्ये समन्वय राखणारी, नियंत्रण राखणारी व त्यांचे व्यवस्थापन करणारी संस्था असणार आहे.

कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन: 28 एप्रिल

दरवर्षी 28 एप्रिल या दिवशी ‘कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन’ साजरा केला जातो.

2020 या वर्षी हा दिन "स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज" या संकल्पनेखाली पाळला गेला आहे. यावर्षी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, कामाच्या ठिकाणी संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव या विषयाकडे लक्ष केंद्रित केले गेले आहे.

28 एप्रिल हा दिवस कामगार संघटनेच्या चळवळीद्वारे जगभरात आयोजित केला जाणारा ‘मृत व जखमी कामगारांसाठीचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन’ देखील आहे.

You might be interested:

कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन: 28 एप्रिल

कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन: 28 एप्रिल दरवर्षी 28 एप्रिल या दिव ...

5 महिना पूर्वी

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थ ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 29 एप्रिल 2020

दिनविशेष 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची (28 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:28 April 2020

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघालेपृथ्वीच्या उत्तर ध्रु ...

5 महिना पूर्वी

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम जागतिक आरोग्य संघ ...

5 महिना पूर्वी

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले पृथ्वीच्या उत्तर ध्रु ...

5 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: