Bookmark Bookmark

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली

दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भारतीय संसदेच्या राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे 250 वे अधिवेशन आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

अधिवेशनात सरकार बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारी देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय (हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) स्थलांतरित लोकांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक मांडण्याचा विचार करीत आहे आणि हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टोक्ती दिली.

इलेक्टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही विधेयक केलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.

या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. शिवसेना NDA युतीतून अधिकृतरीत्या बाहेर पडली आहे. महाराष्ट्र राज्यातला सत्ता संघर्ष चिघळल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध संपुष्टात आले आहेत. मुख्यमंत्री पदाचे आश्वासन भाजपने न पाळल्याने शिवसेनेने भाजपशी युती तोडत कॉंग्रेस आघाडीकडे संपर्क केला आहे. त्यामुळे सरकारकडून शिवसेनेची संसदेत विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय राज्यसभा

राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वर्तमानात उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती आहेत. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात. दिनांक 13 मे 1952 रोजी राज्यसभेची पहिली सत्र बैठक झाली होती.

राज्यसभेत 250 सभासद असून त्यातल्या 12 सभासदांची नेमणुक राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा अश्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांमधून करतात. इतर 238 सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडले जातात. राज्यसभा व लोकसभा यांना समान अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते.

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

सामान्यतः राज्यसभेचे दर वर्षी 3 सत्र होतात. ते पुढीलप्रमाणे आहेत -

  • बजेट सत्र : फेब्रुवारी - मे
  • पावसाळी सत्र : जुलै - ऑगस्ट
  • हिवाळी सत्र : नोव्हेंबर – डिसेंबर

You might be interested:

एका ओळीत सारांश, 18 नोव्हेंबर 2019

दिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:17 November 2019

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...

9 महिना पूर्वी

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 17 नोव्हेंबर 2019

दिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणारदिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: