Bookmark Bookmark

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्र दिन’ म्हणून साजरा करते. या दिवशी समाजामध्ये पत्रकारितेचे महत्त्व याविषयी जनजागृती केली जाते. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सन्मान देखील केला जातो.

यावर्षीच्या पुरस्कारांचे वाटप उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात करण्यात आले. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत –

  • राजा राम मोहन रॉय पुरस्कार - गुलाब कोठारी (राजस्थान पत्रिकेचे अध्यक्ष)
  • ‘ग्रामीण पत्रकारिता’ वर्ग (संयुक्तपणे) - संजय सैनी (दैनिक भास्कर) आणि राज चेंगप्पा (इंडिया टुडे)
  • ‘विकासात्मक अहवाल’ वर्ग - शिव स्वरूप अवस्थी (दैनिक जागरण) आणि अनू अब्राहिम (मातृभूमी)
  • ‘वित्तीय अहवाल’ वर्ग – कृष्ण कौशिक आणि संदीप सिंग (इंडियन एक्सप्रेस)
  • 'छायाचित्र अहवाल - सिंगल न्यूज पिक्चर' वर्ग - पी. उन्नीकृष्णन आणि अखिल ई. एस. (मातृभूमी)
  • 'छायाचित्र अहवाल - फोटो फिचर' वर्ग - सिप्रा दास (इंडिया एम्पायर मॅगझिन आणि पार्लमेंटरी मॅगझिन)
  • ‘क्रिडा अहवाल’ वर्ग - सौरभ दुग्गल (हिंदुस्तान टाईम्स)
  • 'स्त्री-पुरुष आधारित अहवाल' वर्ग - रुबी सरकार (देशबंधू)

इतिहास

भारतात ‘पत्र परिषद’ याची स्थापना सन 1956 मध्ये झाली, जे की देशातले पहिले पत्र आयोग (Press Commission) होते. पुढे त्याच्या जागी दिनांक 16 नोव्हेंबर 1966 रोजी भारतीय पत्र परिषद (PCI) याची स्थापना करण्यात आली. स्थापना दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय पत्र दिन’ पाळला जातो.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 17 नोव्हेंबर 2019

दिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...

3 आठवडा पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणारदिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

3 आठवडा पूर्वी

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हे ...

3 आठवडा पूर्वी

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

3 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 16 नोव्हेंबर 2019

दिनविशेष कैदेत असलेल्या लेखकाचा दिन - 15 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भविष्यात व ...

3 आठवडा पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:15 November 2019

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्नब्राझील या देश ...

3 आठवडा पूर्वी

Provide your feedback on this article: