Bookmark Bookmark

संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ

संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ

संचारबंदीच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहणार याची खबरदारी भारतीय रेल्वे त्याच्या माल व पार्सल सेवेच्या माध्यमातून घेत आहे.

संचारबंदी जाहीर झाल्यापासून 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 7.75 लक्ष टनांहून अधिक खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेनी देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 6.62 लक्ष टन धान्याची मालवाहतूक झाली होती.

इतर ठळक बाबी

  • रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.
  • कोविड19 महामारीमुळे जाहीर संचारबंदीच्या काळात अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेवर गोळा केली जाणार आणि देशभरात त्यांचा पुरवठा सुरळीत राहणार यासाठी भारतीय रेल्वे सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.
  • फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत वस्तू आणि शेतीसाठी बियाणे याकरिता विशेष पार्सल गाड्यांसाठी भारतीय रेल्वेने मार्ग निश्चित केले आहेत.
  • देशाच्या सर्व भागात अविरत पुरवठा राहावा यासाठी ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत. मार्गावर शक्य त्या सर्व ठिकाणी रेल्वेगाडयांना थांबा देण्यात आला आहे.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2020

दिनविशेष आंतरराष्ट्रीय जॅझ दिन - 30 एप्रिल. आयुष्मान भारत दिन - 30 एप्रिल. अर्थव ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:29 April 2020

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापन ...

5 महिना पूर्वी

कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन: 28 एप्रिल

कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन: 28 एप्रिल दरवर्षी 28 एप्रिल या दिव ...

5 महिना पूर्वी

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थ ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 29 एप्रिल 2020

दिनविशेष 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची (28 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:28 April 2020

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघालेपृथ्वीच्या उत्तर ध्रु ...

5 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: