Bookmark Bookmark

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या भारतीय मानक विभागाचा (BIS) एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार, मुंबई या शहरातले पाणी देशात सर्वात शुद्ध, तर राजधानी दिल्ली या शहरातले पाणी सर्वात दूषित असल्याचे निर्देशनास आले आहे.

BISने भारतातल्या 20 राज्यांच्या राजधानीमध्ये नळाच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासली. BISने दिल्लीच्या 11 वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित केले. या 11 नमुन्यांपैकी सर्व नमुने शुद्धतेच्या विविध मानकांवर अपयशी ठरले. तर मुंबईतल्या 10 ठिकाणांहून संकलित करण्यात आलेले सर्वच्या सर्व 10 नमुने हे शुद्धता मानकांनुसार योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेनुसार शहरांना प्राधान्यक्रमाने दर्शवण्यात आले आहे. त्यानुसार,

  • मुंबई हे प्रथम स्थानी, तर हैद्राबाद आणि भुवनेश्वर हे द्वितीय क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रांची हे शहर आहे.
  • चौथ्या क्रमांकावर रायपूर; पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड आणि त्रिवेंद्रम; नवव्या क्रमांकावर पाटणा आणि भोपाळ; दहाव्या क्रमांकावर गुवाहाटी, बंगळुरू आणि गांधीनगर ही शहरे आहेत.
  • लखनऊ आणि जम्मू हे अकराव्या क्रमांकावर; बाराव्या क्रमांकावर जयपूर आणि देहरादून; तेराव्या क्रमांकावर चेन्नई, चौदाव्या क्रमांकावर कोलकाता आणि सर्वात शेवटच्या पंधराव्या क्रमांकावर दिल्ली आहे.

पाण्याची गुणवत्ता ठरवण्याचे निकष

पिण्याच्या पाण्यासाठी BISद्वारे ठरवून दिलेल्या ‘इंडियन स्टँडर्ड 10500:2012’ या मानकांनुसार पिण्याचे पाणी तपासण्यात आले. ज्या शहरात महापालिकेच्या माध्यमातून पाणी दिले जाते, त्याच शहरातल्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली.

पाण्याचा रंग-चव-गंध, त्यामधला रसायनांचा अंश, घातक द्रव्याचे प्रमाण, जिवाणू-विषाणू, क्लोराइड-फ्लोराइड-अमोनियाचे प्रमाण अशा 11 विविध निकषांवर ही तपासणी करण्यात आली. पाण्यातले आर्सेनिकसारख्या धोकादायक रसायनाचे प्रमाणही लक्षात घेण्यात आले.

BIS विषयी

भारतीय मानक विभाग (Bureau of Indian Standards -BIS) भारतामध्ये राष्ट्रीय मानक निर्धारित करणारी संस्था आहे. हा विभाग ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख यांच्याकडे BIS चे प्रशासकीय नियंत्रण असते. BIS चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि कोलकाता, चेन्नई, मुंबई, चंदीगड आणि दिल्ली येथे प्रादेशिक कार्यालये व 20 शाखा कार्यालये आहेत.

वर्तमान नाव मिळण्यापूर्वी विभागाचे नाव 'भारतीय मानक संस्था' (Indian Standards Institution / ISI) असे होते, जी सन 1947 मध्ये स्थापन केली गेली होती. ‘भारतीय मानक कायदा-1986’ अन्वये 23 डिसेंबर 1986 रोजी BIS कार्यरत झाले.

You might be interested:

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

3 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 17 नोव्हेंबर 2019

दिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...

4 आठवडा पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणारदिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

4 आठवडा पूर्वी

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हे ...

4 आठवडा पूर्वी

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

4 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 16 नोव्हेंबर 2019

दिनविशेष कैदेत असलेल्या लेखकाचा दिन - 15 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भविष्यात व ...

4 आठवडा पूर्वी

Provide your feedback on this article: