Bookmark Bookmark

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा

14 नोव्हेंबर 2017 रोजी पश्चिम बंगाल या राज्याची ओळख असलेले ‘रोसोगोल्ला’ (रसगुल्ला) या मिष्टान्नाला ‘भौगोलिक संकेत (GI) टॅग’ प्राप्त झाले होते.

पश्चिम बंगालचे 'बांगलार रसोगोल्ला' मिष्टान्न जगभरात प्रसिद्ध आहे. GI टॅग मिळाल्याचा दिवस साजरा करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2019 रोजी ‘रोसोगोल्ला दिबस’ (रसगुल्ला दिन) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी रसगुल्लाचे शोधक मानले जाणारे नोबिन चंद्र दास यांच्या पुतळ्याचा सन्मान करण्यात आला.

भौगोलिक संकेत (GI) टॅग

भौगोलिक संकेत (GI) टॅग हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अश्या बर्‍याच प्रसिद्ध उत्पादनांना GI टॅग देण्यात आले आहेत. त्यामुळे हस्तकला आणि प्रादेशिक उत्पादनांना, विशेषत: अनौपचारिक क्षेत्राला, संरक्षण प्राप्त होते.

पश्चिम बंगाल हे भारतात पूर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि बांग्लादेश या देशांना आणि ओडिशा, झारखंड, बिहार, सिक्कीम, आसाम या राज्यांना लागून आहेत. 1 मे 1960 रोजी राज्याची स्थापना झाली. कोलकाता हे शहर या राज्याची राजधानी आहे.

You might be interested:

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न ब्राझील या ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 15 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला बालदिन - 14 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भारतामधून होणार्‍या ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:14 November 2019

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक म ...

9 महिना पूर्वी

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना नवीन राष् ...

9 महिना पूर्वी

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक मासिक घट झाली: CEA

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक म ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 14 नोव्हेंबर 2019

दिनविशेष जागतिक दयाळूपणा दिन - 13 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था जगातला पहिला रेग् ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: