Bookmark Bookmark

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंचयाची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

ब्राझील या देशाच्या ब्राझिलिया या शहरात ‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ (BRICS -Young Scientist Forum) याची चौथी परिषद आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2019 या काळात झाला.

या परिषदेत युवा वैज्ञानिकाचा प्रथम पुरस्कार भारताच्या रवी प्रकाश यांना देण्यात आला आहे. बेंगळुरूच्या ICAR-राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेमधले पीएचडी अभ्यासक असलेले रवी प्रकाश यांनी छोट्या व सीमान्त ग्रामीण दुग्ध उत्पादकांसाठी स्वदेशीच स्वस्त असे दुग्ध शीतकरण संयंत्र तयार केले आहे.

2016 साली ‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची पहिली परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

BRICS विषयी

BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली या समूहाची स्थापना झाली. 2011 मध्ये BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

सन 2018 पर्यंत, BRICSचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) 18.6 महादम (लक्ष कोटी / ट्रिलियन) डॉलर एवढे झाले आहे, जे की जागतिक GDPच्या सुमारे 23.2 टक्के आहे.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 15 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला बालदिन - 14 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भारतामधून होणार्‍या ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:14 November 2019

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक म ...

9 महिना पूर्वी

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना नवीन राष् ...

9 महिना पूर्वी

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक मासिक घट झाली: CEA

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक म ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 14 नोव्हेंबर 2019

दिनविशेष जागतिक दयाळूपणा दिन - 13 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था जगातला पहिला रेग् ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:13 November 2019

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागूमहाराष्ट्रात सत्तास्थापनेचा प् ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: